श्री रामेश्वर मंदिरात दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे घेतलेल्या खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, संगीत अलंकार अनघा गोगटे, रामेश्वर मंदिराचे मानकरी सुनिल परब, संजय परब, संवादिनी वादक गजानन मेस्त्री, शाश्वत बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर, संगीत विशारद सचिन पालव, भालचंद्र पालव आदी उपस्थित होते. दरम्यान, सेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष राजन पोकळे, सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर यांनी कार्यक्रमला भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत प्रथम-सर्वेश राऊळ (कोलगांव), द्वितीय-हेमंत गोडकर (तळवडे), तृतीय-राजेश गुरव (कुडाळ), उत्तेजनार्थ-ज्ञानेश्वर पालयेकर (पालये), मंदार नाईक (तुळस) व वैष्णवी धुरी (पिगुळी) यांनी क्रमांक पटकविले. परिक्षण भालचंद्र केळुसकर व अनघा गोगटे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे निवेदन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रावण महोत्सवाचे संयोजक दीपेश परब, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव रविद्र परब, देवस्थानचे पूजारी भाई गुरव यांचे सहकार्य लाभले.