वेंगुर्ला तालुक्यातील विविध भागातील युवकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रोश केला. यावेळी युवासेना तालुका सचिव म्हणून सागर गावडे, युवासेना शहर सचिव म्हणून उमेश आरोलकर, युवसेना शहर शाखाप्रमुख म्हणून प्रज्वल पालव, विशाल राऊत, सौरभ राणे, शिवराम सातार्डेकर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. हा कार्यक्रम २६ ऑगस्ट रोजी साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला.
यावेळी शिवसेना जिल्हापगमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, सावंतवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष राजेंद्र रेडकर, मळगाव उपविभागप्रमुख संदेश सोनूर्लेकर, एकनाथ हळदणकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, उभादांडा विभागप्रमुख नयन पेडणेकर, उपविभागपमुख संजय गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी केले.