नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या इंडिया ओपन कॉम्पेटिशन (रायफल /पिस्तूल) प्रकारात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील नेमबाज कु.श्रीया रविद्र गोळे हिने १० मीटर पीप साइट रायफल नेमबाजी प्रकारात कास्य पदक तर बंगलोर येथे पार पडलेल्या नॅशनल शूटिंग टूर्नामेंटमध्ये कु. श्लोक सतीश हजारे याने १० मीटर एअर रायफल प्रकारात १७ वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक जिंकून स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया शूटिंगकॉम्पेटिशनमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दोन्ही खेळाडूंना स्नेहल पापळकर-कदम तसेच प्रबोधनकार ठाकरे संकुलाचे अध्यक्ष अरविद्र प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.