वेंगुर्ला तालुक्यासह शहरात रविवारी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष यांनी परिसर दुमदुमून गेला. शनिवारी गणपतीचे पूजन झाल्यानंतर सर्वत्र आरत्या, भजन यांनी सुरू होते. रात्रौपर्यंत ठिकठिकाणी जागर सुरू होता. रविवारी दुपारी म्हामणे झाल्यानंतर सायंकाळपासून गणपती विसर्जनाला सुरूवात झाली. शहरात मांडवी खाडी, साकव, मानसी पूल, चाफाळगा, पत्र्याचे पूल, वेशी भटवाडी, कॅम्प भटवाडी, खांबड आदी ठिकाणच्या पाणवठ्यावर गणपतींचे विसर्जन करण्यात आले. रात्रौ उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते.