भाजपा नेते संदिप गावडे यांचा उपक्रम
आध्यात्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना भाजप व भाजपाच नेते संदिप गावडे यांच्यामार्फत सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातील भजन साहित्य संच देण्यात आले. याचा शुभारंभ पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ४६ भजनी मंडळांना येथील भाजप कार्यालयात भजन साहित्य संच वितरीत करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रितेश राऊळ, विष्णू परब, प्रसाद पाटकर, शरद मेस्त्री, सुधीर गावडे, सुभाष खानोलकर, बाबू भोसले, सुनिल घाग, कार्तिकी पवार यांच्यासह बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.