उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी पुस्तक पाठविण्याचे आवाहन

दिवाळीनंतर वेंगुर्ला येथे चौथे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन होणार असून यानिमित्त कादंबरीसाठी विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांनी आपली पुस्तके पाठवावीत असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले आहे.

      उत्कृष्ट कादंब­यांना सन्मानित करून लेखकांच्या मेहनतीला मान्यता देणे, लेखकांना प्रोत्साहित करणे, जेणेकरून ते त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देतील,

कादंब­यांच्या माध्यमातून समाजातील मुद्द्यांवर विचार निर्माण करणे आणि जागरूकता वाढवणे, वाचनाला प्रोत्साहन देणे आणि वाचकांमध्ये कादंबरींची आवड वाढवणे, उत्कृष्ट कादंब­या भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करणे अशा प्रमुख उद्देशांसाठी आनंदयात्री वाङ्मय मंडळ हा पुरस्कार देत आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमधील नवोदित किवा अनुभवी लेखकही सहभागी होऊ शकतील. कादंबरी ही ऐतिहासिक, सामाजिक किवा प्रेमकथा या प्रकारातील स्वीकारली जाईल. कादंबरी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली असावी. कादंबरी पूर्ण असावी आणि यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत सहभागी नसावी. स्पर्धकाने कादंबरीच्या दोन प्रती पोस्टाने किवा हाती सादर करताना लेखकाचे नाव, संफ क्रमांक, लेखकाची माहिती, कार्य यांची पूर्ण माहितीचा समावेश असावा. कादंबरी ही २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत मंगलमूर्ती एंटरप्रायझेसस्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ला नजिक, ता. वेंगुर्ला, जि. सिधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावी. रोख दहा हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अधिक माहितीसाठी आनंदयात्रीच्या अध्यक्ष वृंदा कांबळी (९४२१२६२०३०) किवा सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संफ साधावा.

Leave a Reply

Close Menu