कांदळवन स्वच्छतेतून कचरा संकलित

स्वच्छता ही सेवाया पंधरवड्यानिमित्त वेंगुर्ला न.प.तर्फे २२ सप्टेंबर रोजी कांदळवन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून संपूर्ण मांडवी परिसराचीही स्वच्छता करीत सुमारे ३ टन कचरा वर्गीकृत करून संकलित केला. या मोहिमेत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छता दूत डॉ.धनश्री पाटील, स्वामिनी महिला बचत गटाच्या रोहिणी लोणे, रोट्रॅक्ट क्लबचे प्रितेश लाड, वेंगुर्ला न.प.चे अधिकारी, कर्मचारी, बॅ.खर्डेकर महाविद्यालय व ग्रीन नेचन क्लबचे विद्यार्थी, स्वामिनी महिला बचत गटाच्या महिला व स्वच्छता प्रेमी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.

 

Leave a Reply

Close Menu