राडा प्रकरणातील २९ जणांची निर्दोष मुक्तता

  वेंगुर्ला शहरात २०११ मध्ये झालेल्या राजकीय राड्यात संशयित असलेले माजी नगराध्यक्ष कै.प्रसन्ना कुबल, तत्कालीन शिवसेने अशोक वेंगुर्लेकर, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक नाईक व शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांच्यासहित २९ जणांची राड्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. झालेला पुरावा व युक्तीवाद याच्याआधारे न्यायालय या निष्कर्षापर्यंत आले की, आरोपींनी गुन्हा केलेला आहे, असा पुरावा न्यायालयासमोर न आल्यामुळे सर्व आरोपींची वेंगुर्ला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड.अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड.स्वप्ना सामंत, अॅड.सुनिल मालवणकर, अॅड.तेजाली भणगे, अॅड. आशुतोष कुळकर्णी व अॅड.प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Close Menu