पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पर्यटकांनी हातभार लावावा-मुख्याधिकारी कंकाळ

पर्यटकांनी पर्यटन स्थळी उघड्यावर कचरा न टाकता नेहमी कचराकुंडीचा वापर करावा व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छता अभियानप्रसंगी केले.

      ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याच्या निमित्ताने २८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जलबांदेश्वरझुलता पूज व नवाबाग समुद्र किनारा स्वच्छ करून अंदाजित २ टन एवढा कचरा वर्गीकृत करण्यात आला.  प्लॅस्टीक पॅकेट्सप्लॅस्टीक  बॉटल्सकाचेच्या बॉटलखराब झालेली जाळीथर्माकोलचप्पलफायबरकापड अशा प्रकारचा विलगीकृत कचरा संकलन करून परिसराची साफ सफाई करण्यात आली. तसेच याठिकाणी उभादांडा ग्रामपंचायतीच्या बीच क्लिनिग मशिनचा  वापर करुन वाळूमधील कचरा गोळा करण्यात आला.  

        या स्वच्छता मोहीमेत मुख्याधिकारी परितोष कंकाळप्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीस्वच्छता दूत डॉ. धनश्री पाटीलबॅ.खर्डेकर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थीउभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे  मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थीग्रीन नेचर क्लबचे विद्यार्थीश्री गणेश महिला बचत गटदुर्वा महिला बचत गटगोल्डन महिला बचत गटक्रांती महिला बचत गटनवोदय महिला बचत गटनारायण महिला बचत गटफातिमा महिला बचत गटवेलांकानी महिला बचत गटसाईसिद्धी महिला बचत गटगुरूमाऊली महिला बचत गटदयासागर महिला बचत गटसमर्थ महिला बचत गटमनस्वी महिला बचत गटएकादशी महिला बचत गटसमृध्दी महिला बचत गटविसोटेश्वर महिला बचत गटनवदुर्गा महिला बचत गटअंकुर महिला बचत गट या गटांच्या महिला सदस्य व स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीय नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu