विधानसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरीता वेंगुर्ला पोलीस ठाणे येथून रेडी चेकपोस्ट व मठ चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथके नेमण्यात आलेली असून सदर पथकामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार, महसुल कर्मचारी, दारुबंदी विभाग कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पथकामार्फत वेंगुर्ला हद्दीत येणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी सुरु असून, त्यात अवैध दारु, अवैध रोख रक्कम, अवैध शस्त्रे, संशयीत इसम यांना तपासून त्यांच्यावर योग्य ती नियमाकुल कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही यंत्रणा काम करीत आहे. पोलीस प्रशासनाकडून जागोजागी बंदोबस्त तैनात केला आहे. वेंगुर्ला पोलीस ठाणे येथून विशेष पोलीस पथके नेमण्यात आलेली असून, त्यांच्याद्वारे हद्दीतील संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून माहिती प्राप्त होताच तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी ही विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.