जिल्ह्यात लवकरच बागायतदार शेतकर्‍यांचा मेळावा-परशराम पाटील

काजू बोर्ड व अपेडाचे वरिष्ठ सल्लागार मित्र तथा जागतिक कृषितज्ज्ञ असलेले डॉ.परशराम पाटील यांची सिधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने चंदगड येथे त्यांच्या गावी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी डॉ.पाटील यांना सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन कृषीक्षेत्राचा आढावा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार डॉ.पाटील यांनी दोडामार्ग, बांदा व वेंगुर्ला येथे प्रत्यक्ष भेटदेऊन फळ पिकांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकरी व बागायतदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात त्यांनी शेतकरी संघटना व निवडक बागायतदार, शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी कृषी व्यवसाय तज्ज्ञ अवधूत कदम, आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सिधुदुर्ग शेतकरी फळ बागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत (बांदा), मडुरा येथील प्रगतशील काजू बागायतदार प्रकाश वालावलकर, तरूण उद्योजक राहूल शेणई, प्रगतशील शेतकरी प्रणव नाडकर्णी (निरवडे), प्रयोगशिल आंबा बागायतदार विलास ठाकूर (मठ), प्रकाश गडेकर (आडेली), काजू बागायतदार रत्नदिप धूरी (मठ), नर्सरी संघटनेचे पदाधिकारी शिवराम आरोलकर, नारळ बागायतदार संघटनेचे प्रतिनिधी महेंद्र मातोंडकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.गोवेकर, डॉ.देसाई उपस्थित होते.

    ऑरगॅनिक काजूला १०० टक्के प्रोत्साहन देण्यासाठी शासनपातळीवरून नवीन स्कीम तयार करण्याची शिफारस केली जाईल. येथील मुलभूत समस्या व त्यावरील उपाय शोधण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्यात सिधुदुर्ग जिल्ह्यात बागायतदार शेतकर्‍यचा मेळावा घेण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. परशराम पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu