निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी घेतली शपथ

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोणत्याही आमिषांना बळी न पडताकोणच्या प्रभावाखाली न येता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ बचतगटातील महिलांमार्फत घेण्यात आली. हा कार्यक्रम बंदररोड गणपती मंदिर नजिक आणि कलानगर चॅपेल येथे संपन्न झाला. यावेळी विविध बचत गटांच्या महिला आणि नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu