पर्यटन जिल्हा सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी येथे विमानतळ कार्यान्वित केले आहे. मात्र, सद्यस्थितीत ‘मुंबई – सिधुदुर्ग – मुंबई‘ अशी विमान वाहतूक सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाया पर्यटनाच्या व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश प्रभू यांनी केंद्रिय विमान वाहतूक मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. आवश्यक असणाया सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणुकीनंतर महाराष्ट्र शासनाची बोलून समन्वय घडवून आवश्यक ती सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. विमान सेवा सुरळीत करण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश व त्याची माहिती घेतली असून त्या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किजरापू राजमोहन नायडू यांनी फोनवर सुरेश प्रभू यांना दिली.
‘उडान‘ योजनेमध्ये हा विमानतळ असल्यामुळे याच्या सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे असे सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले आहे. मुंबई-सिधुदुर्ग ही विमान वाहतूक सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असून मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबईवरून या ठिकाणी येत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये होत असलेल्या विमानतळाबाबतही चर्चा करून या संदर्भात आवश्यक असणारा समन्वय साधण्याची सूचनाही श्री.प्रभू यांनी केंद्रिय मंत्र्यांकडे केली आहे.