मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ९ नोव्हेंबर रोजी लोकशाही दिडी काढून मतदार जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ला शहरातील कलानगर, जुना स्टॅण्ड, विठ्ठलवाडी, दाभोसवाडा, गावडेवाडी याम मार्गावर पालखीमध्ये संविधान ठेऊन ही दिडी काढण्यात आली. यात फातिमा, दूर्वा, अंकुर, नम्रता, श्रीगणेश, श्री नारायण, दर्यासागर, वेलांकनी, गोल्डन, गुरूमाऊली, सेंट अॅन्थोनी नवोदय, एकादशी, समर्थ, मनस्वी आदी महिला बचत गटातील सुमारे ७४ महिला सहभागी झाले होते. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी या दिडीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, बाजारपेठ, दाभोली नाका, पिराचा दर्गा, झुलता पूल, बंदर, एसटी स्टॅण्ड, हॉस्पिटल नाका, त्रिवेणी गार्डन, घोडेबांव गार्डन, भाजी मंडई या ठिकाणी मतदार सेल्फी पॉईंट, मतदार हस्ताक्षर अभियान व मतदान जनजागृती शपथ घेण्यात येणार आहे.