कलावलय वेंगुर्ला आयोजित व बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १० ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह कॅम्प-वेंगुर्ला येथे रोज सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघांना देण्यात येणा-या पारितोषिकांच्या रक्कमेत यावर्षीपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम १५ हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ७ हजार, उत्तेजनार्थ दोन संघांना प्रत्येकी ३ हजार व कायम स्मृतिचिन्हे तसेच वैयक्तिक स्त्री-पुरूष अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक अंगे यांतील प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येकी १ हजार, ७००, ५०० व स्मृतिचिन्हे देण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रू. असून प्रथम येणा-या १५ संघांनाच प्रवेश दिला जाईल. नावनोंदणीसाठी एकांकिका स्पर्धक संघांनी कलावलय अध्यक्ष बाळू खांबकर (९४२२०५५०३९) यांच्याशी संफ साधावा. या स्पर्धेचे यंदाचे २८वे वर्ष असून स्पर्धक संघांनी आपला प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.