परिवर्तन घडविण्याची गरज – आदित्य ठाकरे

खोके कमवणा-यांनी धोके दिले आहेत. त्यांच्यातील बेरोजगारी दूर झालेली आहे. पण महाराष्ट्रातील बेरोजगारी कुठेच कमी झालेली नाही तर ती वाढतच चालली आहे. महाराष्ट्रातील एमआयडीची ओसाड होत चालल्या आहेत. कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. त्यातही काही चांगल्या कंपन्या आहेत त्या गुजरातला पाठवत आहेत. भाजपाचे गुजरात प्रेम आपल्याला भारी पडत चाललय. महाराष्ट्राच्या हक्काचा घास खेचून गुजरातच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. गद्दारांनी महाराष्ट्र लुटला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परिवर्तन घडविणे आवश्यक आहे. राजन तेली यांनी तुम्ही शिवसेनेत येऊन आमची मनं जिकलीत आता निवडणुक जिकण्यासाठी त्यांना सर्वांनी साथ द्या असे आवाहन उबाठा शिवसेनेचे युवा नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ला येथे केले.

      सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ला येथे रविवारी जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. ठाकरे पुढे म्हणालेआज कोकणात चांगले प्रकल्प आणावयाचे असतील तर मविआचे सरकार येणे आवश्यक आहे. कोकणातील आंबाकाजू उत्पादनाला जागतिक दर्जावर न्यायचे आहेत्यासाठी आपले हक्काचे सरकार पाहिजे. येथील शालेय शिक्षणमंत्री शिक्षणाचा दर्जा वाढवू शकले नाहीत. त्यामुळे या भागातील बेरोजगारांना काम द्यावयाचे आहे. आपले सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना महिना ३००० रुपये देणारमहिलांसाठी मोफत एसटी प्रवासव्यापक प्रमाणावर महिला पोलीस भरतीप्रत्येक बेरोजगारीला महिना ४००० रुपये आपले सरकार आल्यावर देणारअसे आदित्य ठाकरे यांनी घोषित केले.

      गेली १५ वर्षे दिपक केसरकर यांनी अगदी निष्क्रियपणे काम केलेत्यामुळे या निवडणुकीत जागरूकतेने मतदान करून राजन तेलींना निवडून आणाअसे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले.

      सध्याच्या सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड चिड आहे. महाराष्ट्राचे सरकार गुजरातसाठी काम करते. शिक्षणआरोगय याची तर दुरावस्थाच झालेली आहे. विकासासाठी आलेले अडिच हजार कोटी गेले कुठेअशा पद्धतीचा विकास होऊन चालणार नसल्याचे ईर्शाद शेख यांनी सांगितले.

      ही निवडणुक म्हणजे परिक्षा पहाणारी लढत आहे. जनतेला न्याय देणारे सरकार आले पाहिजे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून रखडलेला विकास पुन्हा करूया असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. 

      यावेळी उमेदवार राजन तेलीशिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरीउपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकरमाजी नगराध्यक्ष संदेश निकमराष्ट्रवादीच्या नम्रता कुबलशिवसेना उपनेते गौरीशंकर खोतविधानसभा प्रमुख रुपेश राऊळमाजी सभापती जयप्रकाश चमणकरमाजी नगरसेवक प्रकाश डिचोलकरमाजी जि.प.सदस्य सुकन्या नरसुलेठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परबशहरप्रमुख अजित राऊळराष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकरसुमन निकमअस्मिता राऊळठाकरे पक्षाचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामतउपराज्यप्रमुख सुभाष केळकर श्री.रावराणेरितेश जाधवलक्ष्मण आयनोडकरयुवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाटउपतालुकाप्रमुख उमेश नाईक आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन यशवंत परब यांनी केले.

Leave a Reply

Close Menu