रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांच्या माध्यमातून संजीवन सेवा ट्रस्ट संचालित “आनंदाश्रय“ अणाव-मयेकरवाडी या आश्रमामध्ये केलेल्या विविध कामांचा तसेच सुविधांचा लोकार्पण सोहळा 15 नोव्हेंबर रोटरीयन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांचे हस्ते संपन्न झाला.
शिरोडा रोटरी क्लबच्या माध्यमातून व संजीवन सेवा ट्रस्ट संचालित “आनंदाश्रय“ या संस्थेचे कार्याध्यक्ष रघुवीर तथा भाई मंत्री यांनी निराधारांना आश्रयाबरोबरच त्यांच्या कपड्यालत्यापासून जेवणखान व सुविधा देणाऱ्या संस्थेच्या कामाचा अभ्यास करून जो विकास करण्यासाठी काम सुरू केले होते, ते वाखाणण्याजोगे आहे. आपल्या सर्वच रोटरीयनसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या 3170 डिस्ट्रिक्ट रोटरी क्लबच्या मेंबरनी आपला वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस साजरा करताना 10 हजार रुपये या आनंदाश्रमास देवून निराधारांच्या येथील कुटुंबाचा आनंद वाढवा असे आवाहन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांनी आवाहन केले.
यावेळी अणाव येथील आनंदाश्रयचे प्रवेशद्वार उद्घाटन, आश्रम परिसर पेवर ब्लॉक सुशोभिकरण, गो शाळेतील गो मातेसाठी संरक्षित चारा क्षेत्राला तारेचे कुंपण आदी कामांचा तसेच पिंगुळी-रायवाडी येथील जिव्हाळा आश्रमातील निराधारांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक हजार लिटर पाण्याची टाकी व सोलार सिस्टिम या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तसेच आश्रमातील सर्व निराधारांना स्टील थर्मास वाटप मान्यवरांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर व डॉ. विद्याधर तायशेटे, दै.तरुण भारत संवादचे सिंधुदुर्गचे संपादक शेखर सामंत, रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे अध्यक्ष जनार्दन पडवळ, सेक्रेटरी राजन शिरोडकर, अणाव येथील आनंदाश्रयचे संस्थापक अध्यक्ष बबन काका परब, कार्याध्यक्ष रघुवीर उर्फ भाई मंत्री, रोटरीयन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, झोनल सेक्रेटरी राजेश घाटवळ, माजी असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी ॲड. प्रथमेश नाईक, स्वप्निल गडेकर, सागर गडेकर, धनेश आंदुर्लेकर, मालवण रोटरी प्रेसिडेंट रमाकांत वाक्कर, पुरुषोत्तम उर्फ सचिन दळवी, उद्योजक दत्तात्रय भोसले, रोटरीयन डॉ. सचिन गायकवाड, सुनील मठकर, नंदू परब, दिपक मालवणकर आदी उपस्थित होते.
निराधारांचा आपल्या कुटुंबाप्रमाणे दररोजचा दिवस आनंददायी जाण्यासाठी डिस्ट्रिक्ट रोटरी क्लबच्या सक्षम मेंबरनी वर्षाला 5 हजार रुपये देवून सहकार्य करावे, असे आवाहन रघुवीर मंत्री यांनी केले. स्वागत शिरोडा रोटरी क्लबचे अध्यक्ष जनार्दन पडवळ यांनी, सुत्रसंचालन सचिन दळवी यांनी तर आभार सचिन गावडे यांनी मानले. लोकार्पण सोहळ्यानिमित्त आश्रमातील सर्व निराधारांना स्टील थर्मासचे वाटप करण्यात आले.