डॉ. रूपेश पाटकर वामन पंडित
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. यंदा बांदा येथील डॉ. रूपेश पाटकर यांना ‘समाजकार्य पुरस्कार’ (प्रबोधन) पुरस्कार तर ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित (कणकवली) यांना रा.शं.दातार नाट्य पुरस्कार (संपादक-‘रंगवाचा’) जाहीर झाला आहे.
50 हजार रूपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून 18 जानेवारी 2025 रोजी एस.एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या आयपीएस अधिकारी डॉ.मीरा चड्डा-बोरवणकर उपस्थित राहणार आहेत.