गड मोहीम व गड संवर्धन सामाजिक कार्याबद्दल आशिया खंडातील सर्वात मोठे शिवरायांचे चरित्र साकारलेल्या पुणे, आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या सभागृहात, महासंघाच्या -वतीने कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालय महावारसा समिती सिंधुदुर्गचे सदस्य डॉ.संजीव लिंगवत यांचा लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस व महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांच्या हस्ते शिवमुद्रा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.