बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सन १९७४ ते १९७७ सालच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचे स्नेहसंमेलन सलग ८व्या वर्षी गुरूनानक जयंती दिवशी १५ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. प्रारंभी बॅ.खर्डेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि श्री ब्राह्मण देवस्थानला श्रीफळ ठेवून स्नेहसंमेलनाला सुरूवात केली. प्रास्ताविक विजयसिह मोंडकर यांनी केले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष श्रीनिवास नाईक, दिपक सामंत, सीए सुनिल सौदागर, कैवल्य पवार, अरविद सावंत, दिलीप गावडे, वासुदेव राऊळ, शुभांगी सौदागर आदी उपस्थित होते. प्रा.वामन गावडे यांनी मार्गदर्शन केले. गेली सतत ८ वर्षे हा संमेलनाचा उपक्रम सुरू असल्याबाबत आनंद व्यक्त केला. यापुढेही गुरूनानक जयंती दिवशी सर्वांनी उपस्थित राहून स्नेहसंमेलन यशस्वी करावे असे आवाहन श्रीनिवास नाईक यांनी केले.