सरिता पवार गीतेश गजानन शिदे
विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन वेंगुर्लातर्फे कालकथित विनोदिनी आत्माराम जाधव यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार २०२२-२३साठी सिधुदुर्गातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी नीजखुण‘ या बहुचर्चित काव्यसंग्रहाला तर सन २०२३-२४ साठीचा पुरस्कार ठाणे येथील कवी गीतेश गजानन शिदे यांच्या ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत‘ या आशयघन काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम ३ हजार,शाल, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे वितरण वेंगुर्ला येथे डिसेंबरमध्ये करण्यात येणार आहे.