अपंग दिनी सचिन पालव याचा सत्कार

जागतिक अपंग दिनानिमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे दरवर्षी दिव्यांगांसाठी विविध उपक्रम घेण्यात येतात. जन्मतःच दृष्टीहीन असलेला वडखोल येथील सचिन पालव याने अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर संगीत क्षेत्रात मोठे यश मिळवित समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. याची दखल घेऊन वेंगुर्ला भाजपातर्फे पालव याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, प्रशांत खानोलकर, प्रशांत आपटे, प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल, सुधीर पालयेकर, शेखर काणेकर, रविद्र शिरसाट, भाई पालव, श्री. सावळ आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Close Menu