उभादांडा येथे विद्याधर अकादमीच्या माध्यमातून अभिनय व नृत्य अकादमी सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन सरपंच निलेश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, डॉ.सई लिंगवत, डॉ.सुप्रिया रावळ, नृत्य शिक्षक गुरूनाथ धर्णे, नाट्य अभिनेते कृष्णा कदम, नाट्य अभिनेती कांचन धर्णे, ओमकार धर्णे, पार्वती धर्णे, शरद करंगुटकर, साजे परब, सागर धर्णे, ऋतुजा नार्वेकर, सायली करंगुटकर, रूपेश नार्वेकर आदी उपस्थित होते. अभिनय, नृत्य, नाट्यकला अशा माध्यमातून रेखाटलेली कला किवा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर झळकविण्यासाठी स्थानिक लोककला ही अभिनय व नृत्याच्या माध्यमातून बाहेर आली पाहिजे, असे प्रतिपादन सरपंच निलेश चमणकर यांनी केले. मुलांच्या संस्कारांना योग्य वळणं देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी या अकादमीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन डॉ.लिगवत यांनी केले. ‘गराजलो रे गराजलो‘ या चळवळीचे पुरस्कर्ते व नाट्य दिग्दर्शक सहदेव धर्णे यांनी अकादमीचा उद्देश स्पष्ट केला.