स्नेहा नार्वेकर हिची दिल्ली येथे निवड

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाची इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी स्नेहा रंजन नार्वेकर हिने भोपाळ येथे झालेल्या प्रि नॅशनल पिस्तूल शुटींग या क्रिडा प्रकारात नववा क्रमांक प्राप्त करून दिल्ली येथे होणा­या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत एकूण २५०० स्पर्धक सहभागी झाले होते. या यशाबद्दल संस्था सेक्रेटरी जयकुमार देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी अभिनंदन केले आहे. तर प्राचार्य एम.बी.चौगले व सुरेंद्र चव्हाण यांनी स्नेहा हिचे अभिनंदन केले आहे.यावेळी पर्यवेक्षक डी.जी.शितोळे, क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे, जिमखाना चेअरमन व्ही.पी.देसाई, क्रीडा संचालक जे.वाय.नाईक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu