आईचा रुमाल हरवला तो मला सापडला, डेोंगर का पाणी, आबादुबी आट्यापाट्या, लगोरी, अचीपची या आणि अशा बालपणीतील विस्मृतीत गेलेल्या विविध खेळांनी माझा वेंगुर्ला संस्थेने आयोजित केलेल्या आठवणीतील खेळांनी बालपणीच्या आठवणी जागविल्या. माझा वेेंगुर्ला या संस्थेच्या वतीने विस्मृतीत गेलेल्या बालपणीच्या पारंपरिक खेळांचा महोत्सव 28, 29 डिसेेंबर रोजी 3 ते 6 या वेळेत वेेंगुर्ले नगर परिषदेच्या कॅम्प येथील क्रिडांगणावर आयोजित केला होता. या महोत्सवात वेेंगुर्ल्यातील असंख्य आबालवृद्धांनी विस्मृतीत गेलेल्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. वयोवृद्धांनी प्रसंगी प्रशिक्षकाच्या भूमिकेत येऊन आपण बालपणी खेळलेल्या खेळांची माहिती आजच्या पिढीला करून देताना खेळाचा आनंदही लुटला.
सलग आठव्या वष भरविलेल्या या महोत्सवाला वेेंगुर्लेवासीयांनी याहीवष भरभरून प्रतिसाद दिला. खेळ आठवणीतले महोत्सवामुळे माझा वेेंगुर्ला या संस्थेने अनेक पारंपरिक दुर्मिळ होत चाललेल्या खेळांना नवसंजीवनी देताना त्या खेळांचे त्यातील अटी नियमाचे संकलनही केले आहे. गतवष अभिनव फाऊंडेशन आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या सहकार्यातून सावंतवाडीतील जिमखाना मैदानावरही पारंपरिक खेळांचा महोत्सवही भरविला होता. प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबविताना याचे यजमानपद माझा वेेंगुर्ला या संस्थेला मिळावे असे मत अनेकांनी व्यक्त केले. शिस्तबध्द नियोजन आणि नेटके आयोजन, त्याच्या जोडीला सुमारे 50 स्वयंसेवी कार्यकर्त्यांची भक्कम फळी हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य.
खेळांना नवसंजीवनी देतानाच मोबाईलमध्ये अडकून पडलेल्या नवीन पिढीला पुन्हा मैदानावर रमविण्याचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. सावंतवाडीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आंतरराष्ट्रीय कितचे नेमबाजी प्रशिक्षक विक्रम भांगले यांनीही खेळामध्ये सहभागी होत आनंद लुटला.