वेंगुर्ला पोलिसांच्यावतीने पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री तालुक्यात येणा-या पर्यटकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यात मानसीश्वर येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्यावतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आल्या. मध्यरात्री नवीन वर्ष २०२५ चे स्वागत पर्यटकांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. यामध्ये पोलीस हवालदार भगवान चव्हाण, सुरेश पाटील, वाहतूक अंमलदार मनोज परूळेकर, होमगार्ड तुषार मांजरेकर, प्रविण गिरप आदींनी सहभाग घेतला.