कलावलय वेंगुर्ला आयोजित कै.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 10 ते 12 जानेवारी या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात होणार आहेत.
दि.10 रोजी सायं. 5 वा. ज्येष्ठ सिने, नाट्य अभिनेते नंदकुमार पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजन गिरप, उद्योजक दिगंबर नाईक, बीकेसीचे सतिश डुबळे, कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर पदाधिकारी संजय पुनाळेकर, सुनिल रेडकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील नाट्य संहिता लेखकांचे प्रातिनिधीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. यावषपासून कै. राजीव शिंदे स्मृती कलावलय नाट्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावषचा पुरस्कार नाटक, सिनेमा, मालिका, जाहिरात या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या बहुआयामी व्यक्तीमत्व नंदू पाटील यांना देण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर यांची ‘कलम 375‘, उगवाई कलारंग-फोंडाघाट यांची जापसा, संत राऊळ महाराज महाविद्यालय-कुडाळ यांची ‘ऑफलाईन‘, ढ मंडळी-कुडाळ यांची ‘वाल्मिकी, दि. 11 रोजी सायं. 4 पासून मुख्तलीफ थिएटर-कोल्हापूर यांची ‘निर्झर‘, शब्दांकूर रंगमंच-आरवली यांची ‘ओळख‘, नाटकवेडे-रत्नागिरी यांची ‘विठाई‘, मॅडबॉक्स थिएटर-नवी मुंबई यांची ‘मै‘, कलांगण-मालवण यांची ‘विवर‘, दि. 12 रोजी दुपारी तीन वाजल्यापासून गायन समाज देवल क्लब-कोल्हापूर यांची ‘ऑलमोस्ट डेड‘, दृष्टी-पुणे यांची ‘ओळख‘, थिएटरवाले-मुंबई यांची ‘चोली के पिछे क्या है‘, बी.व्ही.थिएटर्स-कुडाळ यांची ‘ऑफलाईन‘, अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबई यांची ‘चारू‘, कलासक्त मुंबई यांची ‘पूर्णविराम‘, क्रिएटीव्ह काट यांची इंटररोगेशन, अशा एकांकिका नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह कॅम्प वेंगुर्ला येथे सादर होणार आहेत. नाट्यरसिकांनी या एकांकिका स्पर्धेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कलावलय परिवारातर्फे करण्यात येत आहे.