दशावतार बाजातील विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

दुसऱ्या अ. भा. दशावतार नाट्य संमेलनानिमित्त अखिल दशावतार नाट्य संस्था व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजित दशावतार बाजातील गायन, अभिनय व लंगारनृत्य स्पर्धेला जिल्ह्यातील स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राप्त अनेक व्हिडिओंमधून तिन्ही स्पर्धांतील प्रत्येकी 20 स्पर्धकांना प्रत्यक्ष सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती.

                दशावतारा बाजातील गायन स्पर्धा प्रथम-अनंत आरोलकर, द्वितीय रुद्र महेंद्र स्वार, तृतीय-गजानन नाईक, उत्तेजनार्थ प्रथम- न्हानू गावडे, उत्तेजनार्थ द्वितीय-अंकुश त्रिबंक आजगावकर. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ भजनाचार्य भालचंद्र केळुसकर बुवा व दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांनी केले.

                दशावतार अभिनय स्पर्धा 1. अथर्व ठुंबरे, 2. वीर नारायण गावडे, 3. पार्थ सावंत, उत्तेजनार्थ 1. सदाशिव गावडे, 2. यश सावंत, 3. गायत्री कावले. परीक्षण पपू नांदोस्कर व महेश गवंडे यांनी केले.

                लंगार नृत्य स्पर्धा : 1. वीर नारायण गावडे व दीपेश जयराम वराडकर, 2. अथर्व रवींद्र सावंत व ओंकार दाभोलकर, 3. रुद्र रामदास म्हपणकर, मयुर प्रवीण तेली, उत्तेजनार्थ- 1. सदाशिव सूर्यकांत गावडे, अथर्व सुनील ठुंबरे, 2. दिशम ओंकार परब-गंश ओंकार परब. परीक्षण जि. प. समाजकल्याण माजी सभापती अंकुश जाधव व संतोष रेडकर यांनी केले.

      विजेत्यांना दशावतार नाट्यसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक भाईडकर, आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा वृंदा कांबळी, गोवा येथील सप्तसूर संगीत संस्थेचे अध्यक्ष विजय केरकर, ज्येष्ठ दशावतार कलावंत यशवंत तेंडोलकर, तरुण भारत संवादचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, पत्रकार संतोष वायंगणकर, बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, भालंचद्र केळुसकर बुवा, अंकुश जाधव, न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडाचे अध्यक्ष वीरेंद्र कामत-आडारकर, सचिव रमेश नरसुले, दशावतार कलाकार महेश गवंडे, संतोष रेडकर, पपू नांदोसकर, ओमप्रकाश चव्हाण आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धकांना संगीत साथ मयुर गवळी, हरेश नेमळेकर व मंदार सावंत यांनी केली. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर आभार वैभव खानोलकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu