शिरोडा माऊली मंदिरात सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा

  शिरोडा येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानच्यावतीने ४ ते १२ मार्च या कालावधीत माऊली मंदिरात ‘सहस्त्रचंडी अनुष्ठान-एक धार्मिक सोहळा‘ आयोजित केला आहे. या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

       दि.४ रोजी सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम, आरती, तीर्थप्रसाद, सायं.५ वा. ह.भ.प.हरिहर नातू (पुणे) यांचे ‘ऋषी नाभाग चरित्र‘ यावर कीर्तन, रात्रौ ९.३० वा. चेंदवणकर द.ना.मंडळाचा ‘महिमा शिवचक्र तीर्थाचा‘ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग, दि.५ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, ९ ते १२.३० पर्यंत कुंकूमार्चन, श्री माऊली ऋग्वेद संहिता अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद, सायं.५ वा. आरवली ऐक्यवर्धक संघाचा भक्तिगीत कार्यक्रम, रात्रौ ९.३० वा. वालावलकर द.ना.मंडळाचा ‘कष्टभंजन मारूती‘ हा नाट्यप्रयोग, दि.६ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, दु.२.३० वा. सत्यअंबा पूजा, सायं. आरती, तीर्थप्रसाद, सायं.५ वा. ह.भ.प.संदिप मांडके (पुणे) यांचे ‘भीममाया अर्था दुर्गा द्रौपदी‘ यावर कीर्तन, रात्रौ ९.३० वा. हरवल्ली प्रॉडक्शन आरवली निर्मित, वसंत सबनीस लिखित ‘सौजन्याची ऐशी तैशी‘ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक, दि.७ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, ९ वा. कुंकुमार्चन, आरती, तीर्थप्रसाद. सायं. ६ वा. दुर्गा नमस्कार पूजा, रात्रौ ९.३० वा. अक्षता सावंत, स्वप्नील गोडबोले, संजोनी जगदाळे, अनुष्का शिंगतोडे यांच्या आवाजात ‘हिदी-मराठी सिने गीतांचा अनोखा नजराणा‘ कार्यक्रम, दि.८ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, ९ वा. कुंकुमार्चन, आरती, तीर्थप्रसाद, सायं. ५ वा.आरवली ऐक्यवर्धक संघातर्फे ग.दी.माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या गाण्यांचा कार्यक्रम, रात्रौ ९.३० वा. बुवा भगवान लोकरे व श्रीधर मुणगेकर यांचा डबलबारी भजनाचा सामना, दि.९ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, आरती, तीर्थप्रसाद, सायं.६ वा. अष्टावधान सेवा कार्यक्रम, रात्रौ ९.३० वा. ऑक्रेस्टा -सरगम म्युझिकल नाईट, दि.१० रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, श्री माऊलीची विशेष गंधपूजा, अग्निअर्चन, सप्तशती पाठ हवन, कुमारीका पूजन, सुवासिनी पूजन, लघुपूर्णादूती, आरती, तीर्थप्रसाद, सायं. ५ वा.कु. निधी जोशी यांचे नाट्यगीत गायन आणि त्यानंतर ह.भ.प.कु.नेहा उपाध्ये (गोवा) ‘कृष्ण सुदामा भेट‘ यावर कीर्तन, रात्रौ ९.३० वा. ‘मिक्स अभंग – री पोस्ट भक्तीगीतांचा अनोखा संगम‘, दि. ११ रोजी धार्मिक कार्यक्रम, स. १० वा. करवीरपीठ येथील स्वामी जगद्गुरू शंकराचार्य यांची उपस्थिती व दर्शन सोहळा, आरती, तीर्थप्रसाद, सायं.५ वा. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारूदत्त आफळे बुवा (पुणे) यांचे ‘धर्मवीर संभाजीराजे‘ यावर कीर्तन, रात्रौ ९.३० वा. सिधुसंकल्प एंटरटेंनमेंट प्रा.लि.निर्मित ‘अयोध्या‘ हे महानाट्य, दि.१२ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सामुदायिक गा­हाणे, दुपारी महाप्रसाद, सायं. गणपती विसर्जन असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानतर्फे केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu