प्रत्येक आरोग्यवान स्त्री ही समर्थ राष्ट्र निर्माणाचा पाया असते. पाया भक्कम तर राष्ट्र भक्कम. म्हणूनच धावपळीच्या युगात स्त्रीचे आरोग्य समर्थ, सुदृढ, सशक्त राहणे गरजेचे असल्याचे मत डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमीच्या संचालिका डॉ.वसुधा मोरे यांनी व्यक्त केले.
डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी आणि लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार वेंगुर्ला-जलबांदेश्वर नजिक निसर्गाच्या सान्निध्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. डॉ. वसुधा मोरे यांनी स्त्रीच्या सुदृढ आरोग्यासाठी योग्य व्यायाम कसा करावा याचे मार्गदर्शन करून उपस्थितांकडून योगाचे प्रकार करवून घेतले. यावेळी डॉ.वसुधाज् अॅकॅडमीचे साधक वृंदा मोर्डेकर, अनिता रेडकर, मयुरी बेहरे, नमिता खानोलकर, अनुजा धारगळकर, नीला यरनाळकर, स्वरा आचरेकर, मंदाकिनी सामंत, मोना नाईक, अश्विनी कुंडेकर, आराधना कुंडेकर, बीना भाटीया, प्रतिक्षा बोवलेकर, नयना आडेकर, दर्शना मोचेमाडकर तसेच लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या पल्लवी कामत, उर्मिला सावंत, कविता भाटीया, सावंतवाडी येथील डॉ.अमृता स्वार, कणकवली येथील स्नेहा खानोलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला रामा पोळजी व डॉ.प्रणव कामत यांचे विशेष सहकार्य लाभले.