जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील धन्वंतरी आयुर्वेद होमिओपॅथीक क्लिनिक येथे धन्वंतरी क्लिनिक, जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, कुडाळ व राजस्थान औषधालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीराचा ६२ रूग्णांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ मुंबईच्या सदस्या उज्वला ठाणेकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सुरेश पुनाळेकर, डॉ.संजिव लिगवत, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय सखी वन स्टॉप सेंटरच्या स्नेहा मोरे,राजस्थान औषधालयाचे राजन वेंगुर्लेकर, डॉ.सई लिंगवत, विद्याधर वरसकर, स्वाती वरसकर, अनिता गायकवाड, स्नेहा नवार उपस्थित होते. या शिबिरात डॉ.सई लिंगवत, डॉ.संजीव लिंगवत, डॉ.स्नेहा नवार, डॉ. धनश्री हिरेमठ यांनी रूग्णांची तपासणी केली.