शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद!

  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्लाचे त्रैवार्षिक अधिवेशन 9 एप्रिल रोजी साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाले. उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, अधिवेशनाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष सीताराम नाईक, राज्य महासचिव राजन कोरगांवकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, जिल्हा शिक्षक नेत्या सुरेखा कदम, महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, सचिव वैभवी कसालकर, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कणसे, सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, शंकर वजराटकर, कोकण विभाग सचिव संतोष परब, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, पतपेढी उपाध्यक्ष ऋतुजा जंगले, वेंगुर्ला तालुका संचालक सीताराम लांबर यांच्यासह सर्व तालुका शाखांचे तालुकाध्यक्ष व सचिव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

      शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक समिती नेहमी शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. शाळा टिकण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षक समिती करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार उदय शिंदे यांनी काढले. या अधिवेशनात सेवानिवृत्त शिक्षकांचा तसेच विविध संस्थांचा पुरस्कार प्राप्त शिक्षक समिती सभासदांचा सत्कार, वेंगुर्ला शाखेमार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा टॉप टेन गुणवंत विद्याथ, जिल्हा शाखेमार्फत घेतलेल्या सराव परीक्षेतील टॉप टेन विद्याथ, इस्रो सफरीत सहभागी वेंगुर्लेतीन विद्याथ यांचा सत्कार तसेच नवनियुक्त शिक्षकांना ओळखपत्र वितरण करण्यात आले. भाग्यवंत शिक्षक सभासदांसाठी लकी ड्रॉही घेण्यात आला.

      सन 2025 ते 2028 करिता निवडलेल्या नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष-प्रसाद जाधव, तालुका सरचिटणीस- रामा पोळजी, शिक्षक नेते-सिताराम नाईक, कार्याध्यक्ष-किरण मुडशी, उपाध्यक्ष-समीर राऊळ, गणेश आजबे, समीर तेंडोलकर, कोषाध्यक्ष-विनोद मेतर, सहसचिव-सुधर्म गिरप, अंतर्गत हिशोब तपासनीस-रामचंद्र मळगावकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख-सचिन ठाकरे, विभागीय अध्यक्ष-विकास आडे, सुनील राठोड, प्रकाश भोई, विभागीय उपाध्यक्ष-सुंदर म्हापणकर, सचिन नवले, मारुती गुडुळकर, प्रवक्ता दत्तात्रय म्हैसकर, रवी राठोड, तंत्रस्नेही-विजय मस्के, गणेशसिंह चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष ऋतिका राऊळ, सचिव-सरोज जानकर, उपाध्यक्ष-अर्चना मक्राणे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मारुती गुडुळकर व समृद्धी पेडणेकर यांनी, तर आभार सिताराम लांबर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu