मूळचे वेंगुर्ला-गिरपवाडा येथील सध्या मुंबईस्थित असलेले प्राध्यापक तसेच ज्येष्ठ पत्रकार नारायण गिरप यांना जनहित फाऊंडेशन, महाराष्ट्र 2025 चा आदर्श पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रामाणिक आणि निःस्वाथ भावनेने आजपर्यंत समाजाची केलेली सेवा आणि कार्याची दखल घेऊन श्री. गिरप यांना पुरस्कार जाहीर झाला होता. 28 एप्रिल रोजी दादर येथे जनहित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश जामसंडेकर व पँथर आम स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, सुप्रसिद्ध गायिका, संगीत-नाट्य लेखिका मधुवंती पेठे, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी अजित देशमुख यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराबद्दल श्री. गिरप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.