वेंगुर्ला तालुक्याचा बारावीचा निकाल 99.83 टक्के

बॅ.खर्डेकर कॉलेजचा अथर्व जाधव तालुक्यात प्रथम

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला वेंगुर्ले तालुक्यातून शिरोडा व वेंगुर्ले केंद्रातून एकूण 621 विद्याथ परीक्षेस बसले होते. त्यापैकी 620 उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 99.83 टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा अथर्व अतुल जाधव याने 94.50 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

      वेंगुर्ले तालुक्यातील पहिले दहा मानकरी – 1) अथर्व जाधव (94.50) बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, 2) दिया धुरी (93.17 टक्के) बा.म.गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा, 3) ओंकार म्हारव (91.50 टक्के)  रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनियर कॉलेज, 4) राधिका तेरेसे (90.50)  बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, 5) विराज प्रभुसाळगावकर (90.17) बा.म.गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा, 6) वैष्णवी सावंत (89.50) बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, 7) मिताली सातजी (87.83) बा.म. गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा, 8) स्नेहा गावडे (86.83) बा.म. गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा, 9) गायत्री मांजरेकर (84.50)श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, 10) महिमा केळुसकर (83.50) बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय.

Leave a Reply

Close Menu