काही महिन्यांपूर्वी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे वेशीभटवाडी परिसर ते बॅ.खर्डेकर महाविद्यालय या परिसरात जवळजवळ अंतरावर पथदीप बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारात हे पथदीप शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. या कामाबाबत नगरपरिषदेबाबत कौतुकाचे सूर ऐकायला मिळाले. दरम्यान, पावसाळी हंगामामुळे या पथदिपांच्या आजूबाजूची झाडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणी दोन्ही बाजूच्या झांडीमध्ये पथदीप, तर एका ठिकाणी थेट पथदिपांसमोरच वाढलेली झाडी आल्याने रात्रीच्यावेळी पथदीप सुरू असूनही मार्गात अंधार दिसत आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत दिव्यांचा प्रकाश नक्की कोणासाठी असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ही झाडी तोडली असती तर आलेल्या चाकरमान्यांकडून नवीन पथदिपांबाबत नगरपरिषदेचे कौतुक झाले असते. पण केलेल्या दुर्लक्षामुळे विकासकामांची पोचपावती मिळू शकली नाही.
