भारतीय जनता पाटचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पाट, सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प मैदानावर आयोजित केलेल्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, बेंगलोर येथील मिळून 20 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, प्रा.आनंद बांदेकर, विजय रेडकर, सुजाता पडवळ, वसंत तांडेल, हेमंत गावडे, प्रितम सावंत, मनोज उगवेकर, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, समीर कुडाळकर, मनोहर तांडेल, आकांशा परब, सचिन शेट्ये, नामदेव सरमळकर, प्रार्थना हळदणकर, दीपेश केरकर, सुशील परब, आबा कांबळी, रूपेश नवार, निकीत राऊळ, सोमकांत सावंत, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एल. बिडकर, भूषण सारंग, प्रमोद गोळम, राष्ट्रीय पंच अनिल जगदाळे आणि मोहन मालवणकर आदी उपस्थित होते.
सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत वेंगुर्ल्यातील साई स्पोर्टस संघाने विजेते पदासह रोख रूपये 30 हजारचे बक्षिस व आकर्षक चषक तर युथ क्लब नवाबाग संघाने विजेतेपदासह रोख रू 20 हजारचे पारितोषिकासह आकर्षक चषक पटकाविला. या स्पर्धेत तृतीय क्रमांक जय मानसीश्वर संघ ‘अ‘ तर चतुर्थ क्रमांक जय मानसीश्वर संघ ‘ब‘ यांनी पटकाविले असून या दोन्ही संघांना प्रत्येकी 7 हजार रूपयांचे पारितोषिक व चषक देण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट ॲटॅकर म्हणून जेसू, बेस्ट सेटर म्हणून जीवन पवार, बेस्ट लिबेरो म्हणून सौरभ मांजरे, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून संकेत पाटील यांना घोषित करून त्यांना वैयक्तीक पारितोषिके व चषक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून राधाकृष्ण पेडणेकर, प्रा. हेमंत गावडे, चारू वेंगुर्लेकर, ओंकार पाटकर, अजित जगदाळे, ओंकार पोयरेकर, राज चोडणकर यांनी तर समालोचनाचे काम जयेश परब व सचिन सावंत यांनी पाहिले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल असोसिएशन झोनल सेक्रेटरी निलेश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रितम सावंत, सचिन शेट्ये, रियाज मुल्ला, बबलू कुबल, राष्ट्रीय पंच अजित जगदाळे, ओंकार पोयरेकर, राज चोडणकर, केरकर, संघ मालक साईप्रसाद भोई, पांडुरंग खडपकर, सॅमसन फर्र्नांडिस, संदीप शेटये आदी उपस्थित होते. जय मानसीश्वर संघाच्यावतीने विशाल परब यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
