भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेमध्ये १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त संस्थेच्या वाचन कक्षामध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या व नगर वाचनालय संस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खरेदी केलेल्या केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनामध्ये ललित, लेख, कथा, कादंबया, स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके तसेच भविष्य, खेळ, नाटक, ऐतिहासिक, काव्य अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. ग्रंथांचा उपयोग जास्तीत जास्त सभासदांनी, वाचकांनी करावा. नवीन वाचकांनी संस्थेचे सभासद व्हावे असे आवाहन कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल सौदागर, उपकार्यवाह माया परब, सदस्य राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, महेश बोवलेकर, चंद्रकांत पवार, महिमा केळूसकर, विद्याधर वरसकर, विराज वस्त व वाचक उपस्थित होते.
