लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ला या संस्थेला डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटछाया ठक्कर, पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नलिनी पारेख, रिजन कोऑर्डीनेटर उर्मिला सावंत, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पद्मजा वाड यांनी भेट देत आढावा घेतला. भाटीया हाऊस येथील या कार्यक्रमावेळी मोना नाईक, श्वेता आरोसकर, राखी दाभोलकर, राधिका सकपाळ, मनाली कामत या पदाधिकायांना नलिनी पारेख यांनी शपथ प्रदान केली. तसेच ए.पी.जे.अब्दुल कलाम स्कॉलरशिप मिळवून इस्त्रोमध्ये निवड झालेल्या विठ्ठल कोरगांवकर व प्राजक्ता भोकरे यांना छाया ठक्कर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्वागत लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या अध्यक्षा पल्लवी कामत यांनी केले. मोना नाईक, मंदाकिनी सामंत व मृण्मयी केरकर यांनी स्वागतगीत सादर केले. प्रतिज्ञा वाचन निला यरनाळकर यांनी तर हेमा गावस्कर व कविता भाटीया यांनी अहवाल सादर केला आहे. पाहुण्यांची ओळख अर्चना देसाई व प्राची मणचेकर यांनी केली. सूत्रसंचालन अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंजली धुरी, दिशा कर्पे, बिना भाटीया यांनी परिश्रम घेतले.
