वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात आडेली जि.प.मतदार संघाचा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी वायंगणी, दाभोली, खानोली येथील काही उबाठाच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यात वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, ग्रा.पं.सदस्य छाया नांदोस्कर, विद्या कांबळी यांच्यासह आनंद दाभोलकर, अमित कामत, हर्षल सातार्डेकर, आकांशा दाभोलकर, सुनील सावंत, अश्विनी सावंत, विनायक कामत, करण कांबळी, आशुतोष दाभोलकर, तुषार पेडणेकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच पपन बांदवलकर, ग्रा.पं.सदस्य जया पवार, अर्चना दाभोलकर यांच्यासह बाबा पेडणेकर, नैनेश करंगुटकर, सारिका हळदणकर, प्रकाश सागवेकर, अमित दाभोलकर, स्नेहा बोवलेकर, समिधा बांदवलकर, दादा हळदणकर, दाभोली सोसायटी संचालक श्रीकांत चेंदवणकर, कार्यकर्ते गौतम दाभोलकर, चित्रा माडकर, शुभदा डिचोलकर, भूषण प्रभूखानोलकर, खानोली ग्रा.पं.सदस्य अमिता खानोलकर, सागर रांजणकर यांच्यासह अंजली मयेकर, संजय खवणेकर, दिलीप आरेकर, तारक हळदणकर, संजय घारे, अनिल हळदणकर, अश्विनी हळदणकर, पूनम नांदोसकर, मठ ग्रा.पं.सदस्य समीर मठकर, प्रथमेश मठकर, मंदार मठकर, राकेश मठकर आदींचा समावेश आहे. ज्या पक्षाचे आमदार आणि खासदार नाहीत त्या पक्षात राहून आपल्या भागाचा विकास कसा होणार हे ओळखल्याने या दोन सरपंचांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तुमच्या गावाचा जर विकास व्हायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. तुम्ही आमचा जि.प.सदस्य, पं.स.सदस्य निवडून दिलात तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला भरभरून देण्याची जबाबदारी ही माझी असल्याचे आश्वासन पालकमंत्री राणे यांनी दिले. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री यांना खंबीर बनविण्यासाठी आम्ही चांगले रिझल्ट देणार असल्याची ग्वाही मनिष दळवी यांनी दिली. सूत्रसंचालन शैलेश जामदार तर आभार साईप्रसाद नाईक यांनी मानले.
