दिवाळी विशेष कार्यशाळेतून मुलांच्या कलागुणांना चालना

सुट्टीत मुलांच्या मोबाईलचे करायचे काय असा प्रश्न असणाऱ्या आम्हा पालकांसाठी ‌‘माझा वेंगुर्ला‌’ची कार्यशाळा नेहमीच दिलासादायक ठरते. ‌‘माझा वेंगुर्ला‌’चे वेगवेगळे उपक्रम मुलांच्या आणि आम्हा पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरतात, असे प्रतिपादन माझा वेंगुर्ल्याच्या किशोरवयीन मुलांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी विशेष कार्यशाळेत पालकांनी उत्स्फूर्तपणे मांडले.

      या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी राजन गिरप, राजन गावडे, संदीप नाईक, अवधूत नाईक, शशांक मराठे, महेश बोवलेकर, कर्पूरगौर जाधव, तावडे सर, सीमा मराठे, सुनील नांदोसकर आणि माझा वेंगुर्ला टीम उपस्थित होती.

      या तीन दिवसीय शिबिरामध्ये दररोज प्रार्थनेने सुरवात केल्यानंतर व्यायाम आणि योगा यांचे मार्गदर्शन मारिया अल्मेडा यांनी केले. याशिवाय या कार्यशाळेत कुंभारकाम, दगडावर चित्ररेखाटन, बॉटल पेंटिंग, संस्कृतबरोबर गंमत जम्मत, सिंधुदुर्गातील जैवविविधतेची ओळख, जिगसॉ पझल, झुंबा प्रशिक्षण, मुलांचे मानसशास्त्र, रचनास्पर्धा, कथाकथन व शब्दखेळ, स्वर आणि स्वरांचे महत्त्व, गाठ मारण्याचे प्रकार, नारळांच्या झावळ्यांपासून विविध कलाकृती, कॅलिग्राफी, आवाजांची गम्मत, बागकाम, बेडूक आणि अळंबीबद्दल माहिती, जादूचे खेळ अशा विविध उपक्रमांनी मुलांनी प्रात्यक्षिके करत अनुभव घेतला. या कार्यशाळेत अनुक्रमे आशिष कुंभार, गणेश कुंभार, मयूर पवार, अनिल काळे, प्रवीण सावंत, कर्पूरगौर जाधव, शिवानी तुयेकर, रिया सावंत, खेमराज कुबल, मुग्धा मणेरीकर, अमृता पेडणेकर, सिताराम लांबर, अनिल परब, सुनील नांदोसकर, सीमा मराठे, प्रथमेश घारे, मंगेश माणगावकर, जादूगार पूर्वा परब यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मुलांची मनोगत आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले. कार्यशाळेचा समारोप सहभागी 41 मुलांना प्रमाणपत्र वितरण करून संपन्न झाला. कार्यशाळेला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले. समारोपादिवशी संजय पुनाळेकर, सचिन वालावलकर, दादा साळगांवकर, रमेश नार्वेकर, अवधूत नाईक, राजन गिरप, राजन गावडे, प्रशांत आपटे, भरत मोबारकर, महेश वेंगुर्लेकर, अमोल खानोलकर, सुनील नांदोसकर, सीमा मराठे, सदानंद तावडे आणि सर्व पालक उपस्थित राहून मुलांच्या या आनंदात सहभागी झाले.

      कार्यशाळेच्या आयोजना करिता यासिरशहा मकानदार, खेमराज कुबल, श्रुती गायचोर, मयूर पवार, प्रथमेश घारे, शिवम वारंग, नीता आंगचेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Close Menu