शूर नागरिकांचा ‘वीरता‘ सन्मानपत्राने गौरव

    शिरोडा-वेळागर समुद्रकिनारी बुडणा-­या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणा­या आजू आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोझ, समीर भगत, संतोष भगत आणि सूरज आमरे या शूर नागरिकांचा वेंगुर्ला भाजपातर्फे ‘वीरता‘ सन्मानपत्राने गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम वेळागर येथे पार पडला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, पपू परब, सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रणव वायंगणकर, लक्ष्मीकांत कर्पे, अमित गावडे, श्रीकृष्ण धानजी, राहूल गावडे, विजय बागकर, महादेव नाईक, संकेत धुरी, मयुरेश शिरोडकर, विजय पडवळ, संतोष अणसूरकर, अभय बर्डे, सोमकांत सावंत, बाळू वस्त, दादा शेटये, दत्ताराम फटजी, वासुदेव आरोसकर, समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर, प्रज्ञेश गावडे, सचिन वस्त, प्रकाश भगत, मदन अमरे, अशोक भगत, सुधिर भगत, श्याम भगत, शेखर भगत, उदय भगत, मिलिद रेडकर, धनंजय तारी, महादेव चिपकर, महेंद्र गवंडी, अक्षय आरोस्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu