समुहनृत्य स्पर्धेत शेणई बालवाडी प्रथम

  नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे 8 नोव्हेंबर रोजी नगर वाचनालय संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ शहर मर्यादित अंगणवाडी व बालवाडीतील मुलांसाठी घेतलेल्या समुहनृत्य स्पर्धेत शेणई बालवाडी वेंगुर्लाने प्रथम, एम.आर.देसाई इं.मि.स्कूलने द्वितीय  तर अंगणवाडी भटवाडी नं.1ने तृतीय क्रमांक पटकाविला.परिक्षण महेश बोवलेकर व विठ्ठल करंगुटकर यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, उपकार्यवाह माया परब, श्रीनिवास सौदागर, निशिगंधा पवार, भाऊ करंगुटकर, अंगणवाडी ताई, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विजेत्यांना तसेच अंगणवाडी तार्इंना जानेवारी 2026 मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu