57 हजार 207 मतदार निश्चित

 सिंधुदुर्ग जिल्ह्रातील मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगर पंचायत मिळून चारही नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी 57 हजार 207 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 27 हजार 697 पुरूष आणि 29 हजार 510 महिला मतदारांचा समावेश आहे. चारही नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी 74 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून सद्यस्थितीत एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. चारही नगरपंचायतींमध्ये 275 मतदारांची दुबार-तिबार मतदार नोंदणी झाली असून या मतदारांकडून दोन ठिकाणी मतदान केले जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu