भगवान बिरसा मुंडा लाखोंसाठी प्रेरणास्थान!

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात आला. वयाच्या पंधराव्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांसाठी आणि संास्कृतिक संवर्धनासाठी वसाहतवादी सैन्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांचे नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे ते आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे प्रमुख वक्ते प्रा.एस.जी.चुकेवाड यांनी सांगितले. तसेच त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची आठवण, स्वातंत्र्य लढ¬ातील त्यांचे योगदान आणि आदिवासी समाजासाठी केलेले कार्य यांची माहिती दिली. यावेळी पर्यवेक्षक प्रा.डी.जी.शितोळे, ग्रंथपाल एस.व्ही.माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.व्ही.एस.चव्हाण, अधिक्षक एस.एस.पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांनी केलेले कार्य हे आदिवासींना स्वत:च्या हक्कांबाबत आवाज उठविण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रा.शितोळे यांनी सांगितले. प्रास्ताविक एस.व्ही.माने यांनी केले. तर आभार प्रा.आर.के.हराळे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu