वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट¬गृहात महाराष्ट्र राज्य हौशी नाट¬स्पर्धेच्या वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला आहे. या फेरीचे उद्घाटन ठाणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी विष्णू केतकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धा हे केवळ निमित्त आहे. हौशी रंगभूमीला आजही मोठ¬ा परिश्रमाने पदरमोड करून जिवंत ठेवणारे कलावंत ख¬या अर्थाने कलेचे साधक आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता रंगदेवतेची सेवा घडते आहे. ही स्पर्धा केवळ गुणदर्शनाचा सोहळा नसून सामाजिक जाणीव, वैचारिक शैली आणि कलात्मक कसदारपणाचा उत्सव आहे, असे प्रतिपादन विष्णू केतकर यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी स्पर्धेचे परीक्षक विजय कोसवणकर (मुंबई), सुजाता गोडसे (इचलकरंजी), अटल प्रतिष्ठान सावंतवाडीचे अध्यक्ष अॅड.नकुल पार्सेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिल वालावलकर, “माझा वेंगुर्ला’चे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ नाट¬कर्मी संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, कॅनडा येथील ज्ञानेश्वरीचे अभ्यासक गविकांत बहुले, जर्मनी येथील मॉडेलिंग क्षेत्र व स्टेज आर्टिस्ट श्रीमती डोरा, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या नाट¬शास्त्र विभागाचे प्रमुख विवेक चव्हाण आदी उपस्थित होते. महाराष्ट्र कला, संस्कृती संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग हे स्वतंत्र केंद्र घोषित झाले आहे. त्यामुळे यावर्षी मालवण व वेंगुर्ला या दोन केंद्रांवर प्राथमिक फेरीच्या नाट¬स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे नियोजन “माझा वेंगुर्ला’ संस्थेच्या माध्यमातून केले आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत वेंगुर्ला केंद्रावर 9 नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम वेंगुल्र्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे सचिन वालावलकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक प्रशांत आपटे यांनी केले. बांबू धोरणासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा आर्थिक निधी दिल्याने कॉनबॅक संस्थेचे संचालक मोहन होडावडेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अॅड.शशांक मराठे यांनी केले.
