शिक्षकांना रोटरी एक्सलन्सी अॅवॉर्डचे वितरण

वेंगुर्ला तालुक्यात उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य राखणा­या पाच उत्कृष्ट शिक्षकांना रोटरी एक्सलन्सी अॅवॉर्ड देऊन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांच्या हस्ते आणि असिस्टंट गव्हर्नर डॉ. कोलते यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यामध्ये वेंगुर्ला नं.१चे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, वजराट नं.१चे मुख्याध्यापक संजय परब, उभादांडा नं.३च्या मुख्याध्यापक नेहा गावडे, शाळा परबवाडा नं.१चे मुख्याध्यापक रामचंद्र झोरे व मातोंड पेंढ­याचीवाडीचे उपशिक्षक समिर तेंडोलकर यांचा समावेश आहे. याप्रसंगी रोटरीचे राजेश घाटवळ, आनंद बोवलेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, अॅड.प्रथमेश वेंगुर्लेकर, अनमोल गिरप, दिलीप गिरप, सचिन वालावलकर,  योगेश नाईक, सुनिल रेडकर, राजू वजराटकर, पंकज शिरसाट, मृणाल परब, स्वप्निल झांटये, डॉ.पाटोळे, प्रा.भेंडवडे, पडते आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu