निबंध लेखन स्पर्धेत मिनाक्षी गांवकर प्रथम

वेताळ प्रतिष्ठान व कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक व पोलीस यांच्या पत्नी, मातांसाठी ‘तो देशासाठी, मी घरासाठी-पण आम्ही दोघंही देशभक्त‘ यावर घेतलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत २७ निबंध प्राप्त झाले होते. यात प्रथम-मिनाक्षी गांवकर (ठाणे), द्वितीय-अंजली सावंत (देवसू), तृतीय-सुषमा वालावलकर (मळगांव) यांनी मनाली राऊत (सावंतवाडी) आणि प्रज्ञा पालकर (वेंगुर्ला) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. निबंधांचे परीक्षण डॉ.सचिन परूळकर यांनी केले. विजेत्यांना प्रतिष्ठानच्या आगामी महोत्सवात गौरविण्यात येणार असल्याची माहिती विवेक तिरोडकर व अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu