‘कोकणरत्न‘ पदवीसाठी श्री.घोगळे, डॉ.लिगवत यांची निवड

 

 

 

 

 

 

 

संजय घोगळे                                              डॉ. संजीव लिगवत

वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तर डॉ. संजीव लिगवत यांच्या विविध संस्थांमध्ये तसेच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, गिर्यारोहण, किल्ले संवर्धन, अवयवदान, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे ‘कोकणरत्न‘ पदवीसाठी या दोघांची निवड केली आहे. १३ डिसेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे  संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पदवी प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी वरिष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय कुवेसकर यांनी दिली आहे. दरम्यान, श्री.घोगळे आणि डॉ.लिगवत यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.  

Leave a Reply

Close Menu