नगर वाचनालय, वेंगुर्लातर्फे 9 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्वरूपाची मराठी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली. त्याचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- पहिली ते चौथी (वैयक्तिक गट-कविता गायन)-प्रथम-कृष्णा सुरेंद्र चव्हाण (देसाई स्कूल), द्वितीय-अनन्या वसंत नंदगिरीकर (वेंगुर्ला नं.1), तृतीय-रघुवीर अमृत काणेकर (वेंगुर्ला नं.3), चतुर्थ-परी नितीन सडवेलकर (राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा), पाचवा-सिया अनंत मठकर (उभादांडा नं.2), पाचवी ते सातवी (वैयक्तिक गट-गीत गायन)-प्रथम-आदित्य दत्ताराम नवार (उभादांडा नं.1), द्वितीय-रूद्र महेंद्र स्वार (वेंगुर्ला नं.3), तृतीय-भार्गवी बाबूलाल यादव (वेंगुर्ला हायस्कूल), चतुर्थ-आर्या गोपाळ चेंदवणकर (देसाई स्कूल), पाचवा-प्राजक्ता प्रबोध मराठे (वेंगुर्ला नं.4), पहिली ते चौथी (सामुहिक गट-समुहनृत्य)-प्रथम-शिवाजी प्रागतिक, द्वितीय-परबवाडा शाळा, तृतीय-वेंगुर्ला नं.1, चतुर्थ-वेंगुर्ला नं.2, पाचवा-राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा, पाचवी ते सातवी (सामुहिक गट-समुहनृत्य)-प्रथम-उभादांडा नं.1, द्वितीय-वेंगुर्ला नं.1, तृतीय-वेंगुर्ला नं.2, चतुर्थ-परबवाडा शाळा. परीक्षण महेश बोवलेकर व विठ्ठल करंगुटकर यांनी केले. कार्यक्रमाला साथसंगत गजानन मेस्त्री व अक्षय सरवणकर यांनी दिली. यावेळी दीपराज बिजितकर, श्रीनिवास सौदागर, सचिन होडावडेकर, प्रा.नंदगिरीकर, निलेश चेंदवणकर यांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत वेंगुर्ला नं.1, वेंगुर्ला नं.2 व परबवाडा शाळेतील विद्याथ्र्यांनी चारही गटात सहभाग घेऊन उत्तमरित्या सादरीकरण केले. त्याबद्दल तिन्ही शाळांना संस्थेतर्फे प्रत्येकी 1 हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सूत्रसंचालन अनिल सौदागर यांनी तर प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले. विजेत्यांना जानेवारी 2026 मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.
