स्मिता गावडे “वुमेन्स ऑफ दी मॅच

होप मिरर फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन आयोजित एकदिवशीय दिव्यांग महिला क्रिकेट सामने खारघर-मुंबई येथे भरविण्यात आले. त्यामध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई दिव्यांग महिला क्रिकेट संघात सामने खेळविण्यात आले. मुंबई संघाची कर्णधार स्मिता गावडे हिने गोलंदाजी करून दोन षटकांमध्ये दोन विकेटसह 12 धावा दिल्या. संघाला जिंकण्यासाठी 43 धावांची गरज होती. तेव्हा तिने 13 चेंडूत 27 धाव करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. स्मिता गावडे हिने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीमुळे तिला “वुमेन्स ऑफ दी मॅच’ हा किताब देण्यात आला. मुंबई संघात दीक्षा तेली (देवगड), शिल्पा गांवकर (आचरा), जॉपसिन डिसोजा (कुडाळ) या खेळाडूंचा समावेश होता. पुढील महिन्यात मुंबई आणि भोपाळमध्ये होणा¬या क्रिकेटसामान्यांमध्ये स्मिता गावडे ही संघाचे नेतृत्व करणार आहे.

Leave a Reply

Close Menu